शिक्षणानंद (माझा लेख)
शिकविणे ही एक कला आहे ती प्रत्येकाला प्रयत्न केल्यास प्राप्त होऊ शकते.
त्याकरिता काही गोष्टी वाचणे सतत चिंतन करणे .माझे लक्ष्य माझे विद्यार्थी
आहे.त्याचा वयोगटाचा विचार आवाका सांगितलेली माहीती विद्यार्थ्यांच्या
दृष्टीने सहज सोपी पचनी पडेल का? अशी हवी.एखाद्या शिक्षकाला वाटते
मी एवढे चांगले शिकवितो तरी मुले गोंधळच करतात.कंटाळलो बुवा आता
आता यांना कसे शिकवावे.?थोडे चिंतन करणे आवश्यक आहे.
आपण मुलांना शिकविले ते त्याना समजले का? किती मुलांना
कळले? दोन मुलांना फक्त यालाच आदर्श अध्यापन म्हणावे का?
मी शिकविलेला घटक पाठ्यांश सर्व मुलांना समजणै आवश्यक आहे पण
तसे घडत नाही.का?तर ते मुलांना कळलेच नाही शिकविण्यातील
बाबी मुलांना कंटाळवाणे वाटले असेल.मनातील भीती असेल
शिक्षकांनी काय शिकविले.कदाचित समजले नसावे. न्यूनगंड
असेल मुलांची शारीरिक अक्षमता मानसिक विचार वयोगट
शिक्षकांची शिकविण्याची भाषा उच्चार गती मुलांच्या मानसिक
गोष्टीचा अजिबात विचार न करता अध्यापन. विद्यार्थ्यांना काय आवडते
याचेही भान असणे महत्त्वाचे आहे.वर्गातील प्रत्येक मुलांचे मन
शिक्षकांना जाणणे आवश्यक आहे.
.
अतिशय सुंदर ब्लॉग आहे सर....
उत्तर द्याहटवा