गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

उपक्रम म्हणजे काय ?

उपक्रम म्हणजे काय ?

शिक्षक दिवसभरात जे शिकवितात.
विविध कृती करून घेतात.
पाठाचे अध्यापन.
पाठ्यांशाचे अध्यापन.
दिवसभरातील सर्व कृती.
चर्चा,तोंडीकाम,गायन,वादन
प्रश्नोत्तरे ,मुलाखत,हितगुज
माहिती कथन,सादरीकरण
विविध हालचाली मुक्त,तालबद्ध
कथाकथन,खेळ,ई.

उपक्रम घेतांना घ्यावयाची काळजी

          व पथ्ये.

* एक नविन उपक्रम आयोजन करणे
त्याचा सराव घेणे.
*दुसऱ्या दिवशी एक नविन उपक्रम घेणे
  व अगोदरील उपक्रम  सराव घेणे.
*असे करीत उपक्रमसाखळी तयार
  करावी.
*किमान दहा उपक्रम याचा नियमित
आलटून पालटून सराव घ्यावा.
* सर्व मुलांना सराव झाल्यावर नविन
उपक्रमांची भर घालावी.
*उपक्रमाचा कालावधी जास्त नसावा
 वेळ--फक्त 5ते 20मिनिटे.(एक उपक्रम)
* जादा वेळेमुळे मुले कंटाळून जातात.
आवडीचे उपक्रम आधी घ्यावेत.
मुलांच्या मानसिकतेचा विचार अवश्य
 करण्यात यावा.
उपक्रमामध्ये मुलांना खूप आनंद मिळतो.
*फक्त शिक्षक या नात्याने आपली भूमिका
महत्त्वाची ठरते.
मुलांचा वयोगट लक्षात घेऊन नियोजन
आयोजन करणे आवश्यक असते.
*एकदा मुलांना उपक्रमाची रूपरेषा
समजली की उपक्रम आनंददायी होते.
*प्रयत्न करून पहा.
म्हणतात..केल्याने होत आहे रे
आधि केलेचि पाहीजे.  समर्थ.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

1 टिप्पणी:

उपक्रम म्हणजे काय?