बालगीत
मायाळू मधमाशी
एक होती मधमाशी .
मध होते तिच्यापाशी.
मध खाण्या गेला बाळ.
ती म्हणाली लवकर पळ.
चावा मी घेईन तुला.
त्रास होईल बघ हे तुला.
बाळ लागला रडायला.
पाया तिच्या पडायला.
कीव येऊन मध दिले.
बाळ मुखी हसू लागले.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा