*जत्रा*
===================
आमची वणी
तिथे कोळसा खाणी
आहेत आमची
मुले मात्र गुणी
वणी मधे असते
जत्रा छान
खूश होती
थोर सान
जत्रेत असतो
गुरांचा बाजार
जत्रेच्या गर्दीने
माणसे बेजार
आकाश पाळण्याची
मजाच न्यारी
बसताच त्यात
हरखतात सारी
रेलगाडी,विमान
रंगीत रंगीत सामान
बघताच झुले
हरपते भान
कुल्फी भेळ
जादूचे खेळ
विचीत्र आरसे
बहुढंगी मेळ
कल्ला बल्ला
धुळीचा धुराळा
जत्रा येते म्हणून
आवडतो ऊन्हाळा
=============
सौ.स्वप्ना पावडे
वणी[10/6, 5:34 AM] Lata Gavali: My pet
I have a pet
& it's name is Bingo.
Bingo is white& brown.
Bingo drinks milk
& eats biscuits.
Bingo barks bow- wow
& Guards our house.
[10/6, 4:29 PM] +91 94036 64130: बडबडगीत
विषय — बाजार
बाजारात जाण्याची
मला भारी घाई
छान छान वस्तू मग
घेऊन देते आई
चिवडा,लाडू,पेढे,शेव
सारे बाजारात मिळे
काय खाऊ काय घेऊ
मला आवडतात फळे
भाजी घ्या भाजी
ताजी ताजी भाजी
सांगत असे बाजारात
जोराजोरात आजी
पालक,मेथी,चुका,भेंडी
खूपच होती स्वस्त
कोवळी कोवळी भाजी खाऊन
सुदृढ बना मस्त.
भाग्यश्री इसलवार
जि.प.प्रा.शा.रायपूर.
[10/6, 4:56 PM] +91 98235 82116: 🍎🍇🍉 बाजार 🍉🍇🍎
बाजार बाजार बाजार..
कशाकशाचा बाजार..
अहो फळे,भाज्या,कडधान्यांचा बाजार..
ताई,माई ,आक्का..
फणस पिकलाय पक्का..
घ्या लगेच विचार करून पक्का...
दादा अहो दादा..
घ्या की ओ कांदा..
नाहीतर होईल भाजीचा वांदा...
चवळी, मूग , मटकी, तूर..
भिजवलेले आहेत मसूर... कडधान्यात प्रथिने मिळतात भरपूर...
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
[10/6, 5:51 PM] +91 95033 74833: *--आज वार शुक्रवार,आजचे बडबडगीत --*
*--यात्रा--*
_आमच्या गावात भरली,_
_छान छान यात्रा.|_
_चल रे जाऊ,_
_सोबत आपण मित्रा..|_
तिथे मिळतील खूप,
रंगबिरंगी खेळणे..|
गोल-गोल फिरणारे,
बघू आपण पाळणे..|
_रंगीत रंगीत दिव्यांची,_
_मोठी मोठी रांग..|_
_ते बघून फिटतील,_
_आपल्या डोळ्यांचे पांग..|_
खूप आपण खाऊ,
तेथे यात्रेत फिरु..|
खाता खाता खाऊ,
खूप गप्पा करु..|
_आमच्या गावाच्या यात्रेत,_
_आपण जाऊ मित्रा,_
_खूपच मोठी भरते,_
_आमच्या गावाची यात्रा..|_
*--निलेश पाटील,--*
*--पारोळा,जि-जळगाव--*
[10/6, 6:12 PM] Meera Tekam: 💐💐बाजार💐💐
माझ्या गावात भरतो बाजार
मिळतात तेथे नाना प्रकार
शेव,बुंदी पेढा,चिवडा
सोबतीलाआले फुटाणे मुरमुरे💐💐
माझ्या गावात भरतो बाजार
मिळतात तेथे नाना प्रकार
आलु,वांगे,मिरची,कांदे
महागाईने केले सर्वाचे वांदे
माझ्या गावात भरतो बाजार
मिळतात तेथे नाना प्रकार
पालक,मेथी,सांबाराची जुडी
आजीने आणली भातक्याची पुडी💐💐💐💐
[10/6, 6:18 PM] Mahadeo Nimkar: 💐 अंकगीत 💐
आईबाबांची मी लाडाची लेक
हत्तीला सोंड असते एक।
ट्रींग ट्रींग वाजतो दादाचा फोन
ससाला कान असतात दोन।
मोठयांनसमोर असावं लीन
पळसाला पाने असतात तीन।
देवाला आवडतो फुलांचा हार
गाईला पाय असतात चार ।
पाऊस पडला मोरा तू नाच
एका हाताचे बोटे पाच ।
दूध पियावे नको तो चहा
षट्कोणाला कोन असतात सहा।
शिक्षणाला हवी .संस्काराची साथ
एका आठवडयाचे वार सात ।
गार पाणी देतो .माठ
दिशा व उपदिशा असतात आठ।
भांडू ना कुणाशी मिळून राहु
नवरात्रीचे दिवस असतात नऊ।
शिक्षणाच्या नेहमी प्रवाहात रहा
रावणाला तोंड होते दहा ।
चला अंकाचे गीत गाऊ
दररोज सारे शाळेला जाऊ ।
...रचना --महादेव निमकर
[10/6, 6:41 PM] Vanmala Vanjari: सर्कस मधला हत्ती
अगडबम हत्ती
सदा करतो मस्ती
झिलमिल डोळे
जसे लोण्याचे गोळे
इटूकली शेपटी
टपोरे कान
क्रिकेट खेळतो
सिक्सर मारतो
सर्वांना दंग करतो
सर्कशीत त्याला भारीच मान
सर्वांचाच तो जीव की प्राण
[10/6, 7:14 PM] Patil Homvati: ........ *बाजार*.......
चला गडे जाऊ
बाजाराला
छान छान खाऊ
आणायला
अक्षा रक्षा
चला गं
फुग्याचे दुकान
पाहु गं
रंगीबेरंगी फुगे
पाहु चला
चला गडे जावु
बाजाराला
रस्ता आहे
काटेरी
जावु आपण
दुपारी
वाटेतली बोरं
खावु चला
चला गडे जावु
बाजाराला
समोर आहे
पुंगीवाला
पो पो वाजवणे
शिकु चला
रुपयाची पुंगी
घेवु चला
चला गडे जावु
बाजाराला
आमच्या बाबांचे
खासर
करु त्यात
सफर
तडंक तडंक नाचत
जावु चला
चला गडे जावु
बाजाराला
✍ होमवती पाटील
[10/6, 7:48 PM] Vanmala Vanjari: जत्रा
सोनू मोनू
जत्रेला जावू
रंगीबेरंगी फुगे घेवू
गरगर चक्री
भिंगभिंग भिंगरी
दादाला टमटम
ताईला पैंजन
पपांना टेलिफोन
आईला कंगण
आजोबांना शाल
आजीला माळ
जत्रेत जाऊ
मिठाई खाऊ
सोनू मोनू
जत्रेला जाऊ
कु वनमाला वंजारी
पं स यवतमाळ
[10/6, 8:16 PM] +91 82752 32045: 🤡 _*सर्कस*-_🤡
_आमच्या गावी आली_
_हश्याची मात्र पिकली_ _खसखस_
_जाड्या नि रड्या सर्कशीला गेले_
_गर्दीमध्ये घामाघूम झाले_
_तिकीट काढून सर्कशीत गेले_
_उंचजागी खुर्चीत बसले_
_चला झाली सर्कस सुरू_
_हत्ती लागला रामराम करू_
_हत्तीने गोल गोल सोंड_ _फिरवली_
_हत्तीने छान छान मजाच केली_
_टूणटूण उड्या मारत माकड आले_
_कोलांट्या उड्या मारू लागले_
_माकड माकडीन नाचू लागले_
_हसून हसून पोटच दुखले_
_ठुमकत ठुमकत जोकर आला_
_गमती जमती करू लागला_
_खोड्या करून झोके घेतले_
_लटके झटके देऊ लागले_
_सर्कशीत जाण्याची मजाच भारी_
_प्राणी पाहण्याची मजाच न्यारी_
✏ _*सुचिता कुलकर्णी*_✏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा