गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

उपक्रम म्हणजे काय ?

उपक्रम म्हणजे काय ?

शिक्षक दिवसभरात जे शिकवितात.
विविध कृती करून घेतात.
पाठाचे अध्यापन.
पाठ्यांशाचे अध्यापन.
दिवसभरातील सर्व कृती.
चर्चा,तोंडीकाम,गायन,वादन
प्रश्नोत्तरे ,मुलाखत,हितगुज
माहिती कथन,सादरीकरण
विविध हालचाली मुक्त,तालबद्ध
कथाकथन,खेळ,ई.

उपक्रम घेतांना घ्यावयाची काळजी

          व पथ्ये.

* एक नविन उपक्रम आयोजन करणे
त्याचा सराव घेणे.
*दुसऱ्या दिवशी एक नविन उपक्रम घेणे
  व अगोदरील उपक्रम  सराव घेणे.
*असे करीत उपक्रमसाखळी तयार
  करावी.
*किमान दहा उपक्रम याचा नियमित
आलटून पालटून सराव घ्यावा.
* सर्व मुलांना सराव झाल्यावर नविन
उपक्रमांची भर घालावी.
*उपक्रमाचा कालावधी जास्त नसावा
 वेळ--फक्त 5ते 20मिनिटे.(एक उपक्रम)
* जादा वेळेमुळे मुले कंटाळून जातात.
आवडीचे उपक्रम आधी घ्यावेत.
मुलांच्या मानसिकतेचा विचार अवश्य
 करण्यात यावा.
उपक्रमामध्ये मुलांना खूप आनंद मिळतो.
*फक्त शिक्षक या नात्याने आपली भूमिका
महत्त्वाची ठरते.
मुलांचा वयोगट लक्षात घेऊन नियोजन
आयोजन करणे आवश्यक असते.
*एकदा मुलांना उपक्रमाची रूपरेषा
समजली की उपक्रम आनंददायी होते.
*प्रयत्न करून पहा.
म्हणतात..केल्याने होत आहे रे
आधि केलेचि पाहीजे.  समर्थ.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

बालगीते/बालकविता

     बालगीत

     मायाळू मधमाशी 

     एक होती मधमाशी .
मध होते तिच्यापाशी.
       मध खाण्या गेला बाळ.
ती म्हणाली लवकर पळ.
       चावा मी घेईन तुला.
  त्रास होईल बघ हे तुला.
बाळ लागला रडायला.
    पाया तिच्या पडायला.
 कीव येऊन मध दिले.
 बाळ मुखी हसू लागले.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

लाभदायक वाचनकट्टा

पसरट वाचनकट्टा

पसरट वाचन कट्टा म्हणजे  शिकविण्यापूर्वी  पाठावरील शब्द
 एका वर्तमानपत्रावर लेखन करून त्यावर ठेवणे होय.
लिहण्यासाठी बाजारात लग्नकार्ड(कोरे)उपलब्ध आहेत.
पाठातील निवडक जोडाक्षरेयुक्त शब्द त्या कार्डवर लिहावे.
व शिकविण्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांना  वाचण्यास सांगावै.
त्यांनंतर पाठ शिकविण्यास सुरूवात करा.

उपक्रमाचे फायदे

1पाठापूर्वी शब्द माहीत होते.
2सराव होतो
3मुले पाठ सहजरित्या वाचू शकेल
4शब्द माहीत झाल्यामुळे पाठाचे
अध्यापन चांगले  होईल.
मुले प्रतिसाद  देतील.
5.अशाप्रकारे  सदर उपक्रम मुलांच्या 
दृष्टिने वाचनाकरिता फायद्याचे  आहे.
आपणही करून  पहा .
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
----------------------++++++------------------

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

ईंग्रजी उपक्रम वर्ग 1ते5

Multi flash activitiy

कृती; या उपक्रमात English 26मुळाक्षरे तयार करावीत.

नंतर जोड कागदावर  पहिल्या भागावर capital अक्षरे 
लिहावित नंतर मागील भागावर  अक्षराशी संबधित  शब्द
लिहावीत. पुढे small अक्षरे लिहावित.

मागील बाजूस three four line मध्ये त्या अक्षराचे
लेखन करावे (caoital and small)

असे तयार झालेले flash cards  उपक्रमासाठी तयार झालेत.
आता पुढची प्रक्रिया पाहू.........

कृती1 ***  फरशीवर वर्तुळ काढून त्यात तयार केलेले

कार्डस् ठेवावै.मुलांना वर्तुळाकार  बसवून त्यातील एक 
आवडीचे कार्ड उचलायास सांगा. मुले उचलून  ती वाचतील
आणि गोल फिरतील.



कृती2*** नंतर गटात शब्दांचे वाचन करून घेणे. 

कृती3*** पुढे लेखन करून  घेणे

कृती4*** 26अक्षरांपासून विविध लहान छोटे शब्द मुलांकडून

तयार करून घ्यावित.


जसे+++ dog pen cat bat name cow bus god

याप्रमाणे मुलांकडून अधिक सराव करून घ्यावा.

अभिप्राय अवश्य द्यावा.धन्यवाद ....



आमची स्वच्छ व सुंदर शाळा

शाळेचे बाह्यांग

    सुंदर रंगरंगोटी  आकर्षक ईमारत 

    चित्र रेखाटन  फिरती कुंडी उपक्रम

    परिसर देखणे स्वच्छता   
   

    स्वच्छ शाळा,म्हणजे विद्यार्थ्यांंचा मेळा.

     उपक्रम करण्यासाठी मुले होतात गोळा.

      आकर्षक रंग चित्र  लावतात लळा

        असा हा आमचा आनंददायी मळा.

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

ओढ माऊलीची

(माऊलीची भक्तीगीते)   आॕडीयो कॕसेट 

   सन 2009 ला प्रदर्शित झाली.



देव मुंगसाजी 

ही सुदधा आॕडीयो कॕसेट आहे






 या कॕसेट मधील गीते गायन माझे आहे

शिक्षणाची वारी

शैक्षणिक साहित्य

शिक्षणाच्या वारीतील पाहिलेल्या शैक्षणिक 
साहित्य अध्यापनात आपण तयार करून
त्याचा वापर अवश्य करा.

         त्या साहीत्याचे छायाचित्रे 



















शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

विद्यार्थी वाढदिवस




शिक्षणाचे पंचप्राण


शिक्षणाचे पंचप्राण

प्रेमाने प्रेम वाढवू या.
यशाने यश वाढवू या.
विश्वासाने विश्वास वाढवू या.
संपर्काने संपर्क वाढवू या
स्वयंमूल्यमापनातून
स्वयंविकासाप्रत जावू या.
               वि.वि.चिपळूणकर
           शिक्षणसंचालक पूणे.

सुंदर विचार पुष्प

      गुणवत्ता

गुणवत्ता  म्हणजे
      केवळ योगायोग नव्हे.
    गुणवत्ता हे बौद्धिक
प्रयत्नांचे फळ होय.
   नवनिर्मितीचा ध्यास
त्यासाठी आवश्यक आहे...

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

सुविचार

           सुविचार

शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ पण त्याहीपेक्षा प्रेम श्रेष्ठ.

                                     शाहू महाराज.

आमची उपक्रमशील शाळा बोथ.

          शाळेच्या कोतुकास्पद बाबी.

               आमची उपक्रमशील शाळा बोथ  केंद्र-भांडेगाव

                    पं.स.दारव्हा जि.प.यवतमाळ
* शाळेची भव्य ईमारत
*सुंदर आकर्षक बाह्य रंगरंगोटी
*ज्ञानरचनावाद  उपक्रम मांडणी व सजावट
*वर्गवार नाविन्यपूर्ण उपक्रम
*वर्ग 5वी मध्ये एकूण 100 उपक्रम अंमलबजावणी.
*विविध स्पर्धा 
*गायन वादन नृत्य मार्गदर्शन
*विद्यार्थीनिर्मित साहित्य
*उच्च शिक्षित अध्यापक वर्ग
*विद्यार्थी वैयक्तिक मार्गदर्शन
*स्वयंअध्ययन
*प्रगत शैक्षणिक म.उपक्रम
*तालुक्यातील उपक्रमशील नावलोकीक शाळा
*मा.प्रमोद सूर्यवंशी (ग.शि.अ) यांचे सहकार्य व
मार्गदर्शन 
*मा.कुसूमताई झाडे(वि.अ.शि.)यांचे  मार्गदर्शन 
*मा.गणेशभाऊ निमकर(कें.प्र.भांडेगाव) यांचे पर्यवेक्षण
*

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

1.संख्या वर्तुळ                     16.नावाच्या  अक्षरापासून पाच

2.शब्द वर्तुळ                            ईंग्रजी शब्द सांगणे

3 तरंग संख्या वाचन                  17.आगळा वेगळा परिचय
4. गणिते  पपेट्स
5.माझा दत्तक भाऊ.बहीण           18.ईंग्रजी संभाषण
6.तारांचा उपक्रम                  
7.लगोरी उपक्रम                           19.साभिनय कविता/गीत 
8मान्यवरांचे बहुभाषेत स्वागत         गायन.
9.टोपी घाला संख्या  सांगा              20.अभ्यास खो-खो













10.multi flash cards
11.चेंडू उपक्रम
12.शब्द बनवा उपक्रम
13.शब्दफुले
14शब्दसूर्य
15विशेषण खेळ

उपक्रम म्हणजे काय?